शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

शिर्डीत वाहने अडवून लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 5:25 PM

कोपरगाव ते पोहेगाव मार्गे संगमनेर जाणाऱ्या वाहनांना निर्जनस्थळी अडवून, त्यांना मारहाण करून लुटणा-या दोघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली.

शिर्डी : कोपरगाव ते पोहेगाव मार्गे संगमनेर जाणाऱ्या वाहनांना निर्जनस्थळी अडवून, त्यांना मारहाण करून लुटणा-या दोघांना शिर्डीपोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली.संदीप ताराचंद वायकर (वय २३, रा. सोनेवाडी, ता. राहाता) व अमोल बाळासाहेब जाधव (वय १९ रा. मानोरी, ता. राहुरी ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. २५ मार्चला सुखवीर लठवाल ( रा. सोनीपथ, हरियाणा) हे त्यांच्या मालकीची टाटा कंपनीचा टेम्पो (क्रमांक एनएल़०१ एल ४३२५) घेऊन संगमनेरकडे जात होते. रात्री साडे दहाच्या सुमारास बहादराबाद फाट्याजवळ त्यांचा टेम्पो अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व दहा हजार रूपये घेऊन चोरटे फरार झाले होते. याबाबत शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी फौजदार जगदिश मुलगीर, सहायक फौजदार नाना शेंडगे, पोलीस कर्मचारी अर्जुन दारकुंडे आदींच्या पथकाने साध्या वेशात या मार्गावर रात्री गस्त घालून या आरोपींना अटक केली. चोरलेला मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची मोटार सायकल असा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींचा अन्य कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे?, याबाबत पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीPoliceपोलिस