शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

शिर्डीतून विमानसेवा पूर्ववत; बुधवारपासून रोज बारा उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 5:07 PM

कमी दृष्यमानता व खराब हवामानामुळे गेले २७ दिवसांपासून बंद असलेले साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ बुधवार (दि. ११) डिसेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे.

शिर्डी : कमी दृष्यमानता व खराब हवामानामुळे गेले २७ दिवसांपासून बंद असलेले साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ बुधवार (दि. ११) डिसेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे.स्पाईस जेट बुधवारपासून सेवा सुरू करीत आहे. औरंगाबाद विमानतळावर हलवलेली यंत्रणा स्पाईस जेटने पुन्हा साईबाबा विमानतळावर आणली आहे. बुधवारपासून या कंपनीची सहा विमाने जातील आणि सहा येतील, अशी बारा उड्डाणे होणार आहे. यात दिल्ली व चेन्नई प्रत्येकी एक तर बंगळूर व हैद्राबादला दोन फे-या मारण्यात येतील. नंतर यात वाढ होईल. विशेष म्हणजे पहिल्या दिवसासाठी ७० टक्के आगाऊ बुकिंगही झाले आहे.  इंडिगो व एअर इंडियाही लवकरच आपली सेवा सुरू करणार असल्याचे विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी सांगितले.कमी दृष्यमानता व खराब हवामानामुळे गेल्या १४ नोव्हेंबरपासून शिर्डी विमानतळ बंद होते. यामुळे जवळपास साडे सातशे उड्डाणे रद्द करण्यात आली. दरम्यानच्या काळात धावपट्टीवर दृष्यमानता वाढण्यासाठी विद्युतीकरण करण्यात आले असून ७०  ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे डीजीसीएने (डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हील ऐव्हीऐशन) काही दिवसासाठी मर्यादित अनुमती दिली आहे. तीन आठवड्यात काम पूर्ण होईल. त्यानंतर डीजीसीएकडून नाईट लॅन्डींगसह कायमस्वरूपी अनुमती मिळेल. चोवीस तास सेवा सुरू होण्यासाठी किमान दीड महिना लागेल, असे शास्त्री यांनी सांगितले.या विमानतळावर रोज अठ्ठावीस उड्डाणे होत होती. प्रवासी संख्येच्या निकषावर विमानतळ राज्यात मुंबई, पुणे, नागपूरनंतर चौथ्या क्रमांकावर पोहचले होते. रोज येथून दीड हजाराहून अधिक प्रवाशांची ये-जा सुरू होती. विमानसेवा बंद झाल्याने भाविकांचे हाल झाले. काही विमाने औरंगाबादला वळवण्यात आल्याने तिकडून कारने येताना खराब रस्त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या बंदचा विमानतळ विकास कंपनी, विमान कंपन्यांबरोबरच साईदर्शनाला येणारे व्हीआयपी, हॉटेल व्यवसाय व विमानतळावरील टॅक्सी स्टॅन्डला फटका बसला. येत्या दोन महिन्यात पूर्वीपेक्षाही अधिक क्षमतेने हा विमानतळ रन झालेला दिसेल, असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला.

टॅग्स :saibabaसाईबाबाAir Indiaएअर इंडिया