शिर्डी : महंत गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या परिसरात तलवार हातात घेऊन फिरणाऱ्यास शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अण्णासाहेब निवृत्ती कातोरे (वय ४८, रा. निमगाववाडी, ता.राहाता) यास पोलिसांनी अटक करुन त्याच्यारिूध्द शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांची माहिती अशी, साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त शहरात नवीन प्रसादालयाच्या पाठीमागील प्रांगणात गंगागिरी महाराजांच्या १७१ व्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या दुसºया दिवशी शुक्रवारी रात्रीची गस्त सुरू असताना मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास एक जण हातात तलवार घेऊन सप्ताह परिसरात फिरत असल्याचे पोलिसांना समजले. दरम्यान गस्तीवरील पोलीस सप्ताहस्थळी पोहचले असता त्यांनी सदरचा प्रकार पाहिला. लागलीच पोलिसांनी अण्णासाहेब कातोरे यास तलवारीसह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस नाईक महेश पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कातोरे याच्याविरूध्द शिर्डी पोलिसांनी शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे हे करीत आहेत.
शिर्डीत सप्ताहस्थळी तलवार घेऊन फिरणारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:08 IST