शिर्डी : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिर्डीत साई दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी लागली होती.सध्या साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष चालू आहे. साई दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत येत आहेत. दरम्यान श्रावण मासारंभ झाल्यानंतर पहिल्याच सोमवारी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचा उत्साह दुणावल्याचे चित्र पहावयास मिळाले. साई मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर भक्तांची गर्दी झाली होती. हजारो अबालवृध्दांनी साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. भक्तांच्या गर्दीमुळे शहरातील वाहतूकीवर मोठा परिणाम झाला.
शिर्डीत पहिल्याच श्रावणी सोमवारी भक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 4:52 PM