कर्जत : शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरात सकल मराठा समाज व नागरिकांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवकन्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यत्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सकल मराठा समाजाच्या वतीने शिवसृष्टी व जिजाऊ सृष्टीसाठी एक लाखाची मदत जाहीर करण्यात आली. अभिनव युवा प्रतिष्ठान व सकल मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या रक्तदान शिबिरात ९१ जणांनी रक्तदान केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याचा दोन लाखाचा अपघाती विमा उतरविण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठाणचे संस्थापक धनंजय लाढाणे यांनी आभार मानले.
समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. समाज प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव राऊत यांच्या हस्ते शिव प्रतिमा पूजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तेथे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. युवक नेते अजय भैलुमे यांच्यासह मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कोरेगाव येथे सरपंच काकासाहेब शेळके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.
---
१९ कर्जत
कर्जत येथे जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तहसीलदार नानासाहेब आगळेे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, उप अभियंता अमित निमकर आदींनी अभिवादन केले.