अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्यांकाडानंतर झाल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले. दोन खून झाल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना संतप्त झाल्या. त्यामधून फक्त एका पतसंस्थेचे आॅफिस फुटले. त्यानंतर तिथेही शिवसैनिकांनी संयम पाळला. किरकोळ दगडफेक झाली असली तरी ती संतापातून झाली. पोलीसांनी सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. लवकर जामीन मिळू नये यासाठी गंभीर कलम लावले आहेत. हे गुन्हे पोलीस प्रशासनाने त्वरीत मागे घ्यावीत. याविरोधात शिवसेना रविवारी महामोर्चा काढणार असल्याचे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, रावसाहेब खेवरे, शशिकांत गाडे, दिलीप सातपुते, अनिल शिंदे, संदेश कार्ले उपस्थित होते.राठोड म्हणाले, पोलिसांनी आकसापोटी सेना पदाधिका-यांवर गुन्हे दाखल केले आहेत. ३३३ कलम रद्द करून ३३२ कमल लावले. कोणाच्या दबावाखाली हे केले ? हाही प्रश्न आहे. पोस्टमार्टमसाठी मृतदेह औरंगाबादला पाठविण्यात आले होते. तिथेही नावे बदलण्याचा प्रकार झाला असल्याचा आरोप राठोड यांनी पोलीस प्रशासनावर केला. या प्रकरणात एसपींकडून चुकीची भूमिका घेतली गेल्यास त्यांच्या बदलीचीही मागणी करू, मात्र चुकीची मागणी करणार नाही, असेही ते म्हणाले. शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे नगरला येणार असल्याची माहिती अनिल राठोड यांनी दिली. जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार म्हणाले, मयतांच्या कुटुंबियांना अजूनही पोलीस संरक्षण नाही. गुन्हे मागे घेतले नाही तर संयम सुटेल.
शिवसेना काढणार रविवारी महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 4:06 PM
केडगाव दुहेरी हत्यांकाडानंतर झाल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले. दोन खून झाल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना संतप्त झाल्या. त्यामधून फक्त एका पतसंस्थेचे आॅफिस फुटले.
ठळक मुद्देसेना प्रमुख उध्दव ठाकरे येणार नगरला