अहमदनगर : संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा दावा भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला होता. मात्र शिवसेनेने ही जागा आपल्याकडेच ठेवून मंत्री विखे यांना मोठा धक्का दिला आहे.भाजपने मंगळवारी दुपारी पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत संगमनेरचे नाव नाही. संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजपकडून तगडा उमेदवार दिला असा दावा मंत्री विखे यांनी वांरवार केला होता. तर खासदार सुजय विखे यांनीही संगमनेरमधून विखे घरातील सदस्यच भाजपकडून उमेदवार असे सांगितले होते. यादृष्टीने विखे यांनी संगमनेरमध्ये लक्ष घातले होते. गावोगावी सभा घेऊन थोरात यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या जागेसाठी विखे यांनी भाजपमध्ये आपले वजन वापरले होते. परंतु भाजपने पहिल्या यादीत संगमनेर वगळले आहे. सेनेकडून संगमनेरमधून अद्याप कोणी तयारी करताना दिसत नाही. यामुळे सेनेचा उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता आहे.
संगमनेरमध्ये विखेंना शिवसेनेचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:54 PM