कोपरगाव : अजित पवार व त्यांच्या सवंगड्यांनी २००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आणून गोदावरी कालव्यांच्या मानगुटावर तो लादला. मतदार संघात २००४ व व २००९ निवडणुकीत निष्क्रिय आमदार निवडून दिला. त्यामुळे ढोंग करणा-यांच्या नादी लागू नका. अन्यथा तालुक्याचे वाटोळे होईल, अशी टीका कोपरगाव शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केली. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा येथील गोदावरी लॉन्समध्ये प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. याप्रसंगी माजी संचालक धनंजय जाधव, रिपाइंचे दीपक गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, राज्यात युती धर्म पाळण्याचे आदेश आमचे नेते उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. खालच्या पातळीवर टीका करून विरोधक स्वत:चे हसे करून घेत आहेत. विरोधकांची मुंबईतील कारस्थाने जनतेला सांगण्याची वेळ आली आहे. चुकीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवाल तर कोपरगावकर सर्वस्व गमावून बसेल. विकासाची सध्या सुरळीत चालू असलेली गाडी घसरून जाईल. शेतक-यांचे सुरळीत चाललेले संसार उदध्वस्त केले. खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडेची कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मार्गी लावली. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील त्याचा मोठा पाठपुरावा केला. किरण खर्डे म्हणाले, विरोधकांसह अन्य उमेदवारांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.
पवारांनीच लादला समन्यायी पाणी वाटपाचा कायदा-शिवाजी ठाकरे; कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुणताब्यात सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:32 PM