शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट
4
Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर
5
“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत
6
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
7
चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...
8
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
9
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
10
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
11
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
12
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
13
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
14
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
15
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
16
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
17
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
18
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
19
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
20
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!

शिवालयांमध्ये घुमला ‘हर हर महादेव’ चा गजर

By admin | Published: August 24, 2016 12:18 AM

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावरील श्री ढोकेश्वराची तिसऱ्या श्रावणी सोमवारी मोठी यात्रा पार पडली.

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावरील श्री ढोकेश्वराची तिसऱ्या श्रावणी सोमवारी मोठी यात्रा पार पडली. ‘हर हर महादेव’ च्या गजराने श्री ढोकेश्वर परिसर दुमदुमून गेला होता. सोमवारी पहाटे कावडीने आणलेल्या गंगाजलाने महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ढोकीचे सरपंच बाबासाहेब नर्हे, मंदिराचे पुजारी गोसावी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. हजारो शिवभक्तांनी ‘हरहर महादेव’चा गजर केल्याने परिसर भक्तिमय झाला होता. उंच डोंगरावरील या मंदिरात जाण्यासाठी चारशे पायऱ्या चढाव्या लागतात. त्यामुळे महिला व वृद्धांची दमछाक होत होती. टाकळीमधून शिवभक्तांना मंदिराकडे जाण्यासाठी पारनेर आगाराने अचानक बस बंद केल्याने भाविकांचे हाल झाले. शिवभक्तांसाठी २१ क्विंटलचा प्रसाद व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. दुुपारी तीन नंतर कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला. यावेळी नगर जिल्ह्याबाहेरुनही मल्लांनी हजेरी लावली. जवळेत गर्दीजवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील पुरातन महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. शिवसेवा मंडळाच्यावतीने भाविकांना खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. सिध्देश्वर दऱ्यात रीघपळवे : पळवेबुद्रुक (ता. पारनेर) येथील सिध्देश्वर येथील सिध्देश्वर दऱ्यात तिसऱ्या श्रावण सोमवारी सुमारे पाच हजार भाविकांनी हजेरी लावली. भाविकांच्या गर्दीने शिवलिंग मंदिर परिसर फुलून गेले होते. सिध्देश्वरला जाताना आदेश्वराचे मंदिर आहे. कधीही न आटणारा झरा येथे आहे. आतापर्यंतच्या दुष्काळात या झऱ्याचे पाणी आटलेले नाही, हे या झऱ्याचे वैशिष्ठ्य आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने गजानन शास्त्री महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे नेते दादा कळमकर यांनी येथे हजेरी लावली. तांदळाच्या पिंडीचे आकर्षणसुपा : हंगा (ता. पारनेर) येथे श्रावणी सोमवारी निघणाऱ्या कोरड्या तांदळाच्या पिंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दरवर्षी श्रावण महिन्यात गावातील हंगेश्वर मंदिरात भाविक कोरडे तांदूळ देतात. या तांदळापासून पिंडी तयार होतात नंतर या पिंडी एकावर एक ठेवताना मध्ये लिंबू ठेवतात. या पिंडीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. मंदिराचे प्राचीन काम म्हणजे वास्तुकलेचा आदर्श नमुना आहे. ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोध्दार केल्याचे मनोहर दळवी यांनी सांगितले. भाविकांसाठी दर्शनरांग, पार्किंग सुविधा, पाण्याची सुविधा केल्याचे सरपंच तुकाराम नवले यांनी सांगितले. माजी सरपंच कारभारी नग्रे तसेच गावातील तरुणांनी यात्रेचे नियोजन केले होते. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.