संगमनेर : अपंगाला धक्काबुक्की करणार्या तळेगाव दिघे येथील कोतवालावर कारवाई करण्याची मागणी अपंग सहाय्य सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. विठ्ठल शिंदे हे अपंग हयातीचा दाखला घेण्यासाठी तळेगाव दिघे तलाठी कार्यालयात गेले होते. परंतु कार्यालयातील कोतवालाने पैशांची मागणी करून शिंदे यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. तसेच अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करून अपमानीत केले. या संदर्भात सोमवारी अपंग सहाय्य सेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार शरद घोरपडे यांना निवेदन देवून संबंधित कोतवालावर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी तालुकाप्रमुख आनंद खरात, शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, अमित चव्हाण, दीपक साळूंके, शंकर मुर्तडक, बाळासाहेब दिघे, गणपत वामन, रामभाऊ दिघे, विजय दिघे, धोंडिबा घुले, सखाराम दिघे, भाऊसाहेब लामखडे, जिजाबाई सातपुते, सुषमा शेळके आदींसह अपंग सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोतवालाकडून धक्काबुक्की
By admin | Published: June 10, 2015 1:15 PM