घोडेगाव : घर बांधण्याच्या वादावरूनवरुन आज सकाळी नऊ वाजता कान्हा बन्सी कोरडे सकाळी पाणी योजनेच्या टाकी वर चढत शोलेस्टाईल आंदोलन केले.सकाळी-सकाळी कान्हा कोरडे हातात विषारी औषधांची बाटली घेऊनच हा प्रवास सुरु झाला. भाऊ घर बांधणीसाठी आडवा येतो. आमचा वाद आता सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, गावकरी यांनी मिटवून न्याय द्यावा. अन्यथा टाकीवरुन उडी मारुन आत्महत्या करील, असे जोरजोराने ओरडत सांगत होता. असे म्हणत एक ते दीड तास कोरडे याने थरार केला. पाण्याच्या टाकी खाली गाव जमा झाले. सगळ्यांनी खाली उतरण्याची विनंती केली. भावाने सगळ्या अटी नाईलाजाने मान्य केल्या. सोनई पोलीस स्टेशनचे कैलाश देशमाने यांनी शिवाजी माने, राहुल भांड, बाबा वाघमोडे, काका मैरे यांना तातडीने घटनास्थळी पाठवले. पोलीस शिपाई शिवाजी माने टाकीवर जात कान्हास खाली आणले. दीड तास चाललेले शोले स्टाईल थरार नाट्य कान्हास ताब्यात घेऊन संपले. पोलीस कान्हाला घेऊन गेल्यावर सर्वांनीच निश्वास टाकला. कान्हा बन्सी कोरडे यास सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घोडेगावमध्ये शोले स्टाईल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:35 PM