शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

Independence Day 2018 शूरा आम्ही वंदिले : १२ दिवस मृत्यूला केले दारात उभे, शहीद योगेश धामणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:29 PM

१२ दिवस त्यांनी मृत्यूलाही दारात उभे केले़ पण कडव्या झुंजीनंतर ११ डिसेंबर २०१६ रोजी योगेश यांची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देशिपाई योगेश धामणे जन्मतारीख १३ जुलै १९८२ सैन्यभरती २००१ वीरगती ११ डिसेंबर २०१६ सैन्यसेवा १५ वर्षे वीरपत्नी ऋषाली योगेश धामणे

३० नोव्हेंबर २०१६ रोजी आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत योगेश धामणे युद्ध सरावाला हेलिकॉप्टरमध्ये जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यातील ४ जवानांपैकी ३ जवान देशसेवा करताना शहीद झाले. योगेश बेशुद्धावस्थेत होते. खूप उंचावरून खाली कोसळल्याने त्यांच्या शरीरातील हाडे मोडली होती. शरीराला वरच्या भागात कुठेच जखम दिसत नव्हती. लागलेला मार हा अंतर्गत होता त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव सुरु होता. बाहेरून ठिकठाक दिसणारे शरीर आतून मात्र ठिसूळ झाले होते. एयर अ‍ॅम्बुलन्सने त्यांना कलकत्त्यात कमांड हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. १२ दिवस त्यांनी मृत्यूलाही दारात उभे केले़ पण कडव्या झुंजीनंतर ११ डिसेंबर २०१६ रोजी योगेश यांची प्राणज्योत मालवली.नगर तालुक्यातील सारोळा कासार हे खरे तर सैनिकांचे गाव. गावात प्रत्येक घरातून एक तरूण देशसेवेसाठी सैन्यात आहे. देशभक्तीचे हे अनोखे उदाहरण ठरावे. मुळात या गावात देशसेवा तरुणांच्या नसानसात भिनल्याने देशाच्या रक्षणासाठी प्रत्येकजण सैन्यात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. गुरुजींची संख्या जास्त असल्याने हे गाव गुरुजींचे म्हणूनही ओळखले जाते. गावात अनेक जवान देशसेवेसाठी कामी आले, त्यातील काहींचे गावात सदैव स्मरण राहावे म्हणून स्मारकही उभारण्यात आले आहे.सारोळा कासार हे गाव आता ग्रामविकासाच्या बाबतीत चर्चेत आले आहे. गावाने एकी करून पाणलोटाचे जे काम उभे केले ते अफलातून आहे. यामुळे गावाने आता दुष्काळाचा शाप धुऊन टाकला आहे. याच गावातील भास्करराव रंगनाथ धामणे आणि झुंबरबाई धामणे या दाम्पत्याच्या पोटी १३ जुलै १९८२ रोजी योगेशचा जन्म झाला. योगेश हे बालपणापासूनच धाडसी, पराक्रमी, गुणवान होते. शेतकरी मुलाचे बालपण जसे सरते तसेच साधेसुधे जीवन योगेश यांचेही होते. लहानपणापासूनच देशसेवेची आवड असल्याने योगेश यांना लष्कराचे आकर्षण होते. त्यामुळे २००१ मध्ये देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून योगेश यांनी लष्करी सेवेत प्रवेश केला. पुण्यातील खडकी येथे त्यांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली. लगेचच लष्करी प्रशिक्षण खडकीतील बी.ए.जी. सेंटरमध्ये झाले. दिघी येथे त्यांनी देशसेवेची आणि देशरक्षणाची शपथ घेतली.त्यांची पहिलीच नेमणूक जम्मूमध्ये झाली. त्यानंतर मेरठ, पुणे, रांची, राजस्थान आणि शेवटी पश्चिम बंगाल अशा देशाच्या कानाकोपºयात त्यांना देशसेवा करण्याची संधी मिळाली. ज्या ज्या ठिकाणी योगेश गेले तेथे त्यांनी आपल्या शौर्याने सर्वांची वाहवा मिळवली. साहसी आणि पराक्रमी गुण अंगी असल्याने त्यांनी अनेकदा शत्रूला चीतपट केले. दरम्यानच्या काळात योगेश यांचा विवाह नगर तालुक्यातील खडकी येथील ऋषाली यांच्याशी झाला. दोघांचा संसार सुखाचा सुरु होता. पुढे योगेश यांना कन्यारत्न झाले. भूमीवर प्रेम म्हणून तिचे नावही भूमी ठेवण्यात आले. सर्व काही आनंदात चालू होते. २०१३ मध्ये पुन्हा दुसरी आनंदाची बातमी त्यांच्या घरात आली. योगेशला दुसरे कन्यारत्न झाले. तिचे नाव श्रेया ठेवण्यात आले. जवळपास १६ वर्षे लष्करात सेवा झाली होती. वर्षभरानंतर ते सेवानिवृत्त होऊन घरी येणार होते.त्यावेळी त्यांची नेमणूक पश्चिम बंगालमधील सुकूना या ठिकाणी होती. येथे उणे सात अंश सेल्सिअस तापमानाखाली रात्रंदिवस डोळ्यात तेल ओतून जवान आपली देशसेवा करत होते. चीनच्या सीमेवर असणारे सुकुना म्हणजे एक प्रकारचे स्मशानच होते. योगेश उत्कृष्ट चालक होते. त्यांची ड्रायव्हिंग पाहून त्यांचे सहकारी नेहमी त्यांची स्तुती करायचे. हा भूभाग चीनच्या सीमेवरचा. उंच पहाडी प्रदेश, खोल दºया, सतत होणारी हिमवृष्टी, हिमनगांचे होणारे स्लायडिंग अशा प्रतिकूल वातावरणात ते लष्कराला घेऊन वाहने चालवण्याची कसरत करत. योगेश यांची शेवटची सुट्टी १५ आॅगस्ट २०१६ मध्ये झाली. घरापासून एवढ्या दूरवर असल्याने कुटुंबाला कायम त्यांची काळजी लागलेली असायची. प्रारंभी त्यांच्या कुटुंबाचा त्यांनी लष्करात जाण्याला विरोध होता. परंतु योगेश नेहमी म्हणायचे, ‘जेव्हा मी घरी येईल तेव्हा घरच्यांचा आणि जेव्हा सीमेवर जाईल तेव्हा फक्त देशाचा.’सुकूना हे गाव पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात असून समुद्रसपाटीपासून सुमारे १५२७ फूट उंचीवर आहे. ३ डिसेंबर २०१६ रोजी आपण घरी येणार असल्याचा संदेश योगेश यांनी घरी दिला. दरम्यान, ३० नोव्हेंबरला आपल्या ३ सहकाºयांसोबत योगेश युद्ध सरावाला हेलिकॉप्टरमधून निघाले. परंतु खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर भरकटले. पायलट एमर्जन्सी लँडिंगसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. परंतु उपयोग झाला नाही. काही वेळातच त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. त्यातील चार जवानांपैकी ३ जवान देशसेवा करताना शहीद झाले. योगेश बेशुद्धावस्थेत होते. खूप उंचावरून खाली कोसळल्याने त्यांच्या शरिरातील हाडे मोडली होती. शरिराला वरच्या भागात कुठेच जखम दिसत नव्हती. लागलेला मार हा अंतर्गत होता़ त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव सुरु होता. बाहेरून ठिकठाक दिसणारे शरीर आतून मात्र ठिसूळ झाले होते. एयर अ‍ॅम्बुलन्सने त्यांना कलकत्त्यात कमांड हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. ७२ तासांच्या अवधीनंतर योगेश यांना शुद्ध आली. आता योगेश लवकरच बरे होऊन सुखरूप घरी येतील, अशी आशा सर्वांनाच होती. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. सतत १२ दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. हालचाल झाली की रक्तस्राव वाढत होता. दुसरीकडे त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र १२ दिवसांच्या कडव्या झुंजीनंतर ११ डिसेंबर २०१६ रोजी योगेश यांची प्राणज्योत मालवली.एका लढवय्या शूर जवानाचा मृत्यूशी लढताना पराभव झाला होता. १२ दिवस मरणाला दारात उभे करणाºया साहसी जवानाचा करूण अंत झाला. योगेशच्या जाण्याने वीरपत्नी ऋषाली यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. दोन चिमुकल्या जीवांचे बाबा जग सोडून कायमचे निघून गेले होते. ऋषालीतार्इंचा मोठा आधारवड उन्मळून पडला होता.योगेश यांच्या स्वप्नपूर्तीसाठी जगणार...सारोळा कासार गावात योगेश यांच्या निधनाची वार्ता पसरताच गावात शोककळा पसरली. ग्रामस्थ योगेशच्या आठवणीत बुडाले. योगेशचे पार्थिव गावात येताच गावाला अश्रू अनावर झाले. भूमी व श्रेया आपल्या आईच्या कुशीत ढसाढसा रडत होत्या. योगेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. योगेश यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषालीतार्इंना या धक्क्यातून सावरायला वेळ लागला. परंतु दोन मुलींकडे पाहून त्यांनी पुन्हा जीवनाला सुरूवात केली. मोठ्या जिद्दीने मुलींचे शिक्षण त्यांनी पुढे सुरु ठेवले. योगेश यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता ऋषालीतार्इंचा सामना सुरु आहे.शिपाई योगेश धामणेजन्मतारीख १३ जुलै १९८२सैन्यभरती २००१वीरगती ११ डिसेंबर २०१६सैन्यसेवा १५ वर्षेवीरपत्नी ऋषाली योगेश धामणेशब्दांकन : योगेश गुंड

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Lokmatलोकमत