शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लघुपटाची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 3:02 PM

मागील भागामध्ये आपण लघुपटांच्या विषयाबाबत चर्चा केली. या भागात लघुपटाच्या कथेबाबत चर्चा करूयात.

प्रा. बापू चंदनशिवेमागील भागामध्ये आपण लघुपटांच्या विषयाबाबत चर्चा केली. या भागात लघुपटाच्या कथेबाबत चर्चा करूयात. लघुपटाचा विषय व कथा विस्तार याचा आवाका मुळातच कमी किंवा मर्यादित स्वरूपाचा असतो. त्याची कथा आटोपशीर, एखाद्या लहान घटनेबाबत परिणामकारक पद्धतीने भाष्य करणारी असायला हवी. लघुपटामध्ये एकाच वेळी खूप काही सांगता येत नाही. कारण त्याला प्रामुख्याने वेळेची मर्यादा असते. त्यामुळे लघुपटाची कथा ही जास्तीत जास्त छोटी पण प्रभावी असायला हवी. लघुपटाची मूळ कथा खूप कमी वेळा लिहिलेली असते. एखादा लघुपटकार थेटपणे पटकथाच लिहितो. तो पाच-दहा ओळीचा सारांश लिहितो. त्याच्या आधारेच तो पटकथा लिहितो. कारण लघुपटकाराला एखाद्या मूळ कथेवरून पटकथा लिहिणे अवघड जाते. खरेतर माध्यमांतर करणे हे एक कला व कौशल्याचे काम आहे. ते प्रत्येकालाच जमेल असे नसते. बहुतांश लघुपटकार हे नव्यानेच दृकश्राव्य माध्यम प्रकारात उतरलेले असतात. त्यामुळे त्यांना एखाद्या कथेवरून लघुपटाची पटकथा लिहिणे अवघड जाते. त्यामुळे बहुतांश लघुपटकार आपल्या मनात असलेली घटना किंवा कथा ही लघुपटाची कथा बनवतात. त्याचेच ते पटकथेत रुपांतर करतात. या ठिकाणी मात्र लघुपट या माध्यमाची बलस्थाने, विषय व व्यापकतेवर असलेल्या मर्यादा याचा विचार करावा लागतो. कारण लघुपटांना आजही व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे त्यातून नफा मिळविणे असा हेतू असत नाही. लघुपटाची कथा ही कमीत कमी पात्रांची मागणी असणारी असावी. त्यामध्ये शक्यतो साहित्यिक, कलात्मक व सृजनात्मक मूल्य असणे आवश्यक असते. कथा विनाकारण लांबणारी, अधिक संवाद असणारी, नाटकी किंवा मुख्य पात्रांची संख्या अधिक असणारी नसावी. असे झाल्यास लघुपटातील सिनेमॅटीक मूल्य लोप पावण्याची अधिक शक्यता असते. चांगला लघुपट हा कमी लांबीचा, कमी संवादाचा, कमीत कमी पत्रांचा, एकाच कथेभोवती फिरणारा व उपलब्ध तंत्रज्ञाचा त्यामध्ये उत्तम उपयोग झालेला असतो. एकाच कथेमध्ये जर विनाकारण उपकथा जोडल्या तर मुख्य कथा उपलब्ध वेळेत सांगून होत नाही. प्रेक्षकांना काय सांगायचे आहे? हे कथा निवडतानाच ठरलेले असले पाहिजे.जे सांगायचे अर्थात दाखवायचे आहे, त्यामध्ये नेमकेपणा असायला पाहिजे. एखाद्या साहित्यिकाच्या कथेवरून लघुपट बनविला जावू शकतो. पण शब्द माध्यम ते चित्रपट माध्यम यामधील फरक व दोन्ही माध्यमातील जमेच्या बाजू पटकथाकाराला व दिग्दर्शकाला माहित असणे आवश्यक आहे. साहित्य व सिनेमा यांच्या मांडणीमध्ये व सादरीकरणामध्ये मूलभूत फरक आहे, तो माध्यमांतर करताना लक्षात घ्यावा लागतो. मूळ कथेमध्ये दृश्य माध्यमाला मारक ठरणारा भाग पटकथा लिहिताना वगळणे गरजेचे ठरते. तसे केल्यास पटकथा वेगवान होते. कथेमध्ये बऱ्याचवेळा संवादातून गोष्ट सांगितली जाते. लघुपटामध्ये मात्र कथा दृश्याच्या माध्यमातून सांगणे आवश्यक असते. म्हणजेच लिखित स्वरूपातील कोणत्याही कथेमध्ये काही मूळत: काही सिनेमाची तत्वे भरलेली असावी लागतात. कथेतील वेगळेपण हेच लघुपट बनविण्यासाठी प्रेरक गोष्ट असायला हवी. उत्तम लघुपटांची मूळ कथा चांगली असते. त्याचे पटकथेत चांगले रूपांतरण झाल्यास व चित्रिकरण, दिग्दर्शन व संकलन यांचा उत्तम मेळ बसल्यास लघुपट पाहण्यालायक होण्यास मदत होते हे मात्र नक्की.फिल्मोस्कोपी भाग- २०

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcinemaसिनेमा