अहमदनगर : जिल्ह्याला आवश्यक लागणारा ऑक्सिजन, औषधे पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांचा कोविड हॉस्पिटलमधील मुक्काम वाढला आहे. रेमडेसिवीर आणि त्याला पर्यायी असलेल्या काही औषधांचाही तुटवडा कायम आहे. औषधांसाठीही रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव सुरूच आहे. जिल्ह्यात आता पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळाला आहे. मात्र, ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने अजूनही रुग्णांचा जीव टांगणीलाच लागलेला आहे.
केवळ ऑक्सिजन आणि इंजेक्शनच नाही, तर इतरही औषधी मागणीच्या तुलनेत कमी मिळत आहेत. ही औषधी मिळत नसल्याने रुग्णांचा रुग्णालयात मुक्काम वाढत आहे. परिणामी, बेडसची कमतरता आहे. खासगी कोविड रुग्णालयासमोर एकूणच मोठा पेच निर्माण झाला आहे. आतील रुग्ण बाहेर येईना आणि बाहेरील गंभीर रुग्णांना बेड मिळेना. यामुळे नातेवाइकांची घालमेल वाढली आहे. हीच स्थिती सध्या नगरमध्ये पाहायला मिळत आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील रुग्णांसाठी पाच ते सहा हजार रेमडेसिविरची मागणी आहे. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत कमी संख्येने मिळत आहेत. २२ एप्रिल रोजी १,३५९, २३ एप्रिल रोजी २,०१६, तर २४ एप्रिल रोजी ५०० रेमडेसिविरच्या वायल मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले. हे रेमडेसिविरचे डोसही अत्यंत कमी प्रमाणात मिळत आहेत.
-----------
एकूण रुग्ण-
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण-
-------------
२) पुरवठाच नाही
औषधी (प्रतिदिवस) मागणी पुरवठा
रेमडेसिविर वायल ५,००० १,५००-२,०००
टॉसिलिझूमॅप व इतर ५०० ५०-६०
--------------
३) नातेवाइकांची घालमेल
---------------
राजकीय क्षेत्रात असल्याने ऑक्सिजन बेडसाठी अनेकांचे फोन येतात. त्यावेळी सर्व रुग्णालयांशी संपर्क साधावा लागतो. मात्र, नगर शहरात ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत. कुठे बेड आहेत, तर ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. प्रशासनाने ऑक्सिजन वाटपाचे नियोजन करणे गरजेचे आहे.
-अभय आगरकर, माजी नगराध्यक्ष
----------------
माझ्या संबंधातील एका मित्राच्या नातेवाइकाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज होती. चार दिवस अख्खे नगर पालथे घातले. मात्र, एकही इंजेक्शन मिळाले नाही. प्रशासनाकडे विचारणा केली, तर थेट रुग्णांना इंजेक्शन दिल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे रुग्णांचाही हॉस्पिटलमधील मुक्काम वाढला आहे.
-किरण काळापहाड, बालिकाश्रम रोड
-------------
गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण नगर शहरात नातेवाइकासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या बेडसाठी शोधाशोध करीत आहोत. मात्र, एकाही हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. शेवटी रुग्णांना ठेवायचे कुठे, असा प्रश्न पडतो. रुग्णाचे काही बरेवाईट झाले, तर जबाबदार कोण?
-एक नातेवाईक, केडगाव
------------
जवळच्या एका नातेवाइकाचा श्वास कमी झाला, तर ऑक्सिजन बेडसाठी शोधाशोध सुरू झाली. ऑक्सिजन बेड मिळाला, तर ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने धावपळ झाली. आता पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनही मिळाला आहे. मात्र, रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले नाही. आता काय करायचे? असा प्रश्न आहे.
-रुग्णाचे नातेवाईक, सावेडी
------------
शासकीय आणि खासगी कोविड सेंटरमध्ये किती रुग्ण उपचार घेत आहेत, त्यावर आधारित रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलिंडर वाटपाचे प्रमाण ठरलेले असावे. ऑक्सिजन वाटपावर पूर्णपणे प्रशासनाचे नियंत्रण असावे. काही रुग्णालये एकाच वेळी ५० सिलिंडर भरण्यासाठी खासगी प्लांटवर नंबर लावून ठेवतात. त्यामुळे इतर कोविड सेंटरचा नंबर दोन-दोन दिवस लागत नाही. रेमडेसिविर इंजेक्शनही थेट रुग्णांच्या नावेच दिले, तर नातेवाइकांची धावाधाव होणार नाही, तसेच काळाबाजार होणार नाही.
-डॉ. सुमित नलवडे, खासगी कोविड सेंटरचालक
-----------------
जिल्ह्यात सध्या पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता आहे. त्याचे न्याय्य व समप्रमाणात वाटप करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. कोणत्याही रुग्णालयांना ऑक्सिजन कमी पडू देणार नाही. ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटच्या परिसरातही कायदा, सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आदेश दिला आहे.
-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
----------------------
डमी
नेट फोटो
२२ शॉर्टेज ऑफ मेडिसन डमी
कोरोना (२)
ट्रीटमेंट (४)
कोविड (२)