शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
3
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
4
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
5
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
6
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
7
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
8
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
9
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
10
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
11
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
12
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
13
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
14
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
15
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
16
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
17
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
18
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
19
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
20
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

तरुणांची फसवणूक करणा-या सरकारला जागा दाखवा : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 1:18 PM

देशातील दोन कोटी युवकांना नोकरी देण्याचे अश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेवर आले़ मात्र गेल्या पाच वर्षांत तरुणांना नोक-या तर मिळाल्याच नाहीत.

अहमदनगर : देशातील दोन कोटी युवकांना नोकरी देण्याचे अश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेवर आले़ मात्र गेल्या पाच वर्षांत तरुणांना नोक-या तर मिळाल्याच नाहीत. पण ज्यांना नोक-या मिळाल्या, त्यांच्याही नोक-या गेल्या़ त्यांना घरी बसावे लागले़ तरुणांची फसवणूक करणा-या भाजप सरकारला जागा दाखविण्याची हीच वेळ आहे, असे आवाहन महाआघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी नगर येथे केले़महाआघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी शहरासह जिल्ह्यातील युवकांशी शुक्रवारी संवाद साधला़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी तरुणांनी शहरातच रोजगार मिळावा, अशी आशा व्यक्त केली़ युवकांची मते जाणून घेतल्यानंतर जगताप यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली़ ते म्हणाले, भाजप सरकारने सर्वसामन्यांना अनेक स्वप्न दाखविली़ रोजगार, व्यावसायासाठी कर्ज, अशी अनेक आश्वासने सरकारने दाखविली़ परंतु, गेल्या पाच वर्षांत ना नोकरी मिळाली ना व्यावसायासाठी कर्ज, असे सांगत सरकारने युवकांची फसवणूक केली असल्याचे ते म्हणाले़सरकारच्या फसव्या आणि निष्क्रिय धोरणांमुळे तरुणांवर बेरोजगारीचे मोठे संकट ओढावले आहे़ मोदींनी दिलेले दोन कोटी रोजगाराचे आश्वासन, अच्छे दिनचे दाखविलेले फसवे स्वप्न, या सगळ्यांची तरुण आता उघडपणे थट्टा करू लागले आहेत़ देशात आज डीएड-बीएड, एमबीए, इंजिनिअर, झालेले तरुण बेरोजगार आहेत़ पोलीस भरती तसेच एमपीएससी, यूपीएससीचा तरुण रात्रंदिवस अभ्यास करत आहे़ परंतु, गेल्या पाच वर्षांत सरकारने नोकर भरतीच केली नाही़ त्यामुळे तरुणांना नोकरीची संधी मिळाली नाही़ नोकरीच्या शोधात मोठ्या शहरांत दाखल झालेल्या अनेक तरुणांनी गावकडचा रस्ता धरला़ तरुणांना नोकºया देण्याचे धोरण आघाडीच्या काळात घेतले गेले़ तरुणांना नोकºया मिळाल्या़ परंतु, गेल्या पाच वर्षांत तरुणांना नोकºया मिळाल्या नसून सरकारला त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ असल्याचे जगताप म्हणाले़बहुत हुई झुठे वादों की मार....सरकारने बहुत हुए झुठे वादों की मार, अब नही मोदी सरकार, असे म्हणत जगताप यांनी सरकारच्या धोरणांची पोलखोल केली़ यावेळी तरुणांनी व्यथा मांडल्या. त्यावर तरुणांच्या प्रश्नांवर शासन दरबारी आवाज उठवून तरुणांच्या जीवनात नक्कीच चांगला बदल घडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जगताप यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019