बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा -कोरोना व्हायरस अस्मानी संकट पाश्र्वभूमीवर सुरू असलेल्या लाॅकडाउनमध्ये अनेक गोरगरीब कुंटुबांवर उपासमारीची वेळ आली होती. सामाजीक जाणीवेतून तहसीलदार महेंद्र महाजन यांनी संस्था व दानशुर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले आणि मदतीचे अनेक हात पुढे आले. यातून धान्य किराणा मालाची बॅक उभी राहीली. या बॅकेच्या माध्यमातून आता सहा हजार कुंटुबांना मदत केली आणखी दोन ते तीन हजार कुंटुबांना मदत करण्याचे नियोजन चालू आहे.
कोरोनाचे आस्मानी संकट आले आणि नगर जिल्ह्यात २७ कोरोना पाॅझिंटीव्ह रुग्ण आढळले मुंबई व पुणे शहराशी कनेक्ट असलेल्या श्रीगोंदा तालुक्यात कोरोना ला रोखणे मोठे आव्हान होते.अशा परिस्थितीत तहसीलदार महेंद्र महाजन पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव अरविंद माने गटविकास अधिकारी प्रशांत काळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर या प्रशासकीय टीमने आक्रमक भुमिका घेतली रस्त्यावर आला कि चोप देण्याची भुमिका घेतली. जनजागृती केली. सुमारे १४हजार २३० नागरिकांना होमक्वारंटाइन केले त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाची अद्याप एंन्टी झाली नाही.
गोरगरीब भटके कुंटुबांवर उपासमारीची वेळ आली या कुंटुबांचा आक्रोश पाहून तहसीलदार महेंद्र महाजन यांनी सोशल मिडीयावर गोरगरीब कुंटुबांना मदतीचे आवाहन केले .त्यानुसार अनेक संस्था दानशुर व्यक्ती पुढे आल्या त्यांनी प्राधान्य ५०० ते १००० रू चा किराणा माल एका कुटुंबास देण्याचे धोरण घेतले गावो गाव चळवळ निर्माण झाली.
तिरुपती ट्रस्ट श्रीगोंदा महामानव बाबा आमटे, अग्निपंख फाउंडेशन, शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन मुकुंद माधव फाउंडेशन, दक्ष नागरिक फाउंडेशन, राष्ट्रीय-स्वयंसेवक-संघ, काष्टीतील सहकारी संस्था व्यक्ती , बेलवंडी व्यापारी संस्था, श्रीगोंदा शहर व्यापारी संघटना, मी घारगावकर ग्रुप बापू गोरे मित्रमंडळ, खा सुजय विखे पांडुरंग खेतमाळीस, राज देशमुख बाळासाहेब नाहटा, राजेंद्र म्हस्के सम्यक पवार कमलेश भंडारी, , कल्याणी लोखंडे, कोमल वाखारे विश्वास गुंजाळ संदीप गवारे मच्छिंद्र सुपेकर, सतीश बोरा, परितोष भालेराव अंबाई तिखे सतिश पोखर्णा अनीलराव घनवट श्रीकांत जवक मधुकर काळाणे किर्ती गुंदेचा सुधीर लगड, यांनी योगदान दिले धान्य व जीवनावश्यक वस्तुची बॅक तयार झाली आणि सॅनिटरीझर व मक्स तसेच मोठय़ा औषधे उपलब्ध झाली.यामधून सुमारे सहा कुंटुबांना धान्य किराणा वाटप करण्यात आले शिवाय श्रीगोंदा शहरात सहारा केंद्र तसेच शिवभोजनालय तातडीने सुरू केले त्यामुळे हजारो जीवांची भुक भागली आहे
---
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ राहुल द्विवेदी यांनी नगर जिल्ह्यात संचारबंदी केली आणि श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य केले त्यामुळे अद्याप कोरोनाचे श्रीगोंद्यात पाॅझिंटीव्ह पेंशट सापडले नाही ही समाधानाची बाब आहे भुकेल्या जीवांना आधार देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था व दानशुर व्यक्तींनी मदतीचा हात दिला श्रीगोंद्यात जीवनावश्यक वस्तुंची बॅक उभी राहीली आहे सहा हजार कुंटुबांना मदत पोहचली आणखी दोन आडीच हजार कुंटुबांना मदत करण्याचा संकल्प आहे
-महेंद्र महाजन, तहसीलदार, श्रीगोंदा