आॅनलाईन लोकमतश्रीगोंदा (अहमदनगर), दि़ १८ - श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईच्या अस्मानी संकटास सामना करावा लागत आहे, अशा परिस्थितीत तालुक्यातील घारगाव, काष्टी, लोणीव्यंकनाथ येथील शेतकऱ्यांनी पिकविलेली मिरची अमेरिकेत एक्सपोर्ट झाली आहे़ श्रीगोंद्यातील मिरचीच्या तडक्याने अमेरिकेतील पिझ्झा बर्गरला अधिक रुचकर बनविले आहे़फिल्डफ्रेश अॅगो कंपनीचे अमोल लगड, प्रमोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव येथील शरद सोपान खोमणे, विलास बांदल, सुर्यजित बांदल, ऋषी बांदल, सुभाष खोमणे, काष्टी येथील नागेश रसाळ, अमोल दळवी, लोणीव्यंकनाथ येथील पप्पू सोनवणे, पिनू अत्रे, पुरूषोत्तम लगड यांनी पिझ्झा व बर्गरमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलोपिनो या मिरचीची लागवड केली आहे़लोणीव्यंकनाथ येथील शेतकऱ्यांचे मिरचीची शेती पाण्याअभावी जळून खाक झाली़ मात्र घारगाव, काष्टी येथील मिरचीचे प्लॉट चांगलेच बहरले आहेत़ शरद सोपान खोमणे यांनी १५ एकर शेतीमध्ये डाळिंब, उस, लिंबोणी अशी पिके घेत इलोपिनो या मिरचीचीही लागवड केली़ मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनचा वापर करुन फेब्रुवारी महिन्यात ही मिरची लावण्यात आली़ दोन महिन्यानंतर मिरचीची तोडणी सुरु झाली आहे़ही मिरची फिल्डफ्रेश अॅगो कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेत एक्सपोर्ट करण्यात येणार असून, एकरी २५ ते २७ टन उत्पादन निघण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे़ यातून सुमारे पाच रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असून, या मिरचीसाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च झाला आहे़ या मिरचीचा पहिला लॉट अमेरिकेत एक्सपोर्ट करण्यात आला असून, पिझ्झा व बर्गरसाठी ही मिरची उपयुक्त असल्यामुळे मोठी मागणी असल्याचे शेतकरी सांगतात़ मिरचीचे भरला प्रपंचात रंग कुकडीचे पाणी उशीरा सुटले़ त्यामुळे उसाच्या पिकांची वाट लागली़ पण सव्वा एकर क्षेत्रात इलोपिनो मिरचीची १ हजार ६०० रोपे लावली़ त्यासाठी सुमारे दोन लाखाचा खर्च झाला़ सव्वा एकरात २२ टन उत्पन्न १५ एप्रिल अखेर निघाले असून १० ते १२ टन उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे़ हमी भाव असल्यामुळे अपेक्षित पैसेही मिळणार आहेत़ शिवाय या मिरचीला सूर्यप्रकाश भरपूर लागतो़ त्यामुळे उन्हाळ्यात ही मिरची वरदान आहे, असे घारगाव येथील शेतकरी शरद खोमणे यांनी सांगितले़
श्रीगोंद्यातील मिरचीचा अमेरिकेतील पिझ्झाला तडका
By admin | Published: May 18, 2017 1:21 PM