बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा: सुप्त मोदी लाट, विखे घराण्याची श्रीगोंद्याशी असलेली कनेक्टिव्हिटी, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मनापासून विखेंना केलेला सपोर्ट यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या स्वगृही श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले. यामुळे श्रीगोंद्यात भाजपची ताकद आणखीच वाढली आहे.सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत श्रीगोंद्याच्या राजकीय आखाड्यात दोन्ही काँग्रेसचा दरारा असताना श्रीगोंदेकरांनी ‘नमो नमो’ चा जप करीत खासदार दिलीप गांधी यांना सुमारे ५८ हजार २५४ मतांची मोठी आघाडी दिली. माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे यांच्या दृष्टीने अचंबित करणारा हा ऐतिहासिक कौल ठरला. त्यानंतर पाचपुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपचे पाचपुते यांच्या विरोधात शरद पवारांनी विरोधकांची मूठ बांधल्यामुळे राष्ट्रवादीचे राहुल जगताप हे आमदार झाले.या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींची कुठेही लाट दिसत नव्हती. उलट शेतकरी वर्गात नाराजीची भावना होती. मात्र सर्जिकल स्ट्राईकमुळे मोदींची हवा झाली. श्रीगोंद्यात कुणाला मताधिक्य मिळणार?, यावर उत्सुकता होती, अशा परिस्थितीत विखेंना सुमारे ३१ हजार मतांचे मताधिक्य श्रीगोंद्यातून मिळाले.विखेंसाठी बबनराव पाचपुते, भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, सदाशिव पाचपुते, दत्तात्रय पानसरे, अनिल पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, बाळासाहेब नाहाटा, सुभाष डांगे, पुरूषोत्तम लगड, बाळासाहेब गिरमकर, महेंद्र वाखारे यांनी चांगले टीमवर्क केले. त्यातून विखेंना मताधिक्य मिळाले. या टिममुळे जगताप यांना ‘चिखली’च्या घाटात रोखण्याचे काम केले.पाचपुतेंची ताकद वाढलीभाजपला मताधिक्य मिळाल्यामुळे श्रीगोंद्यात बबनराव पाचपुतेंची ताकद वाढली. श्रीगोंदेकरांनी गांधींपेक्षा विखेंना कमी मताधिक्य दिले. संग्राम जगताप श्रीगोंद्याचे असल्याने हा परिणाम झाला. आ. जगताप व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस कशा पध्दतीने एकत्र डावपेच खेळतात? यावर विधानसभेची रंगत अवलंबून आहे.की फॅक्टर काय ठरला?बबनराव पाचपुते यांनी विधानसभा निवडणुकीत हरल्यानंतर जनसंपर्क वाढविला. त्याचा फायदा विखेंना झाला.श्रीगोंद्यात विखे सेना होती या सेनेने आपल्या नेत्यासाठी पाचपुतेंशी जुळवून घेतले.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आपली छुपी यंत्रणा वापरल्याचा फायदा डॉ. सुजय विखेंना झाला.विद्यमान आमदारराहुल जगताप । राष्टÑवादी