श्रीगोंदा : श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी आठ दिवसापूर्वी तहसीलदारपदाचा पदभार सोडला आहे. मात्र श्रीगोंदा तहसीलदार पदावर चार, पाच तहसीलदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे हा श्रीगोंदा तहसीलदारपदाचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयात गेला आहे.
श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी साडेतीन वर्षे तहसीलदारपदावर सामाजिक जाणीवेतून काम करून श्रीगोंदेकरांची मने जिंकली. महेंद्र माळी हे जळगावला बदलून गेले आहेत. त्यांचा पदभार अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. चारुशीला पवार यांनी कामाचा सपाटा लावला आहे.
तालुक्यातील सत्ताधारी पक्षातील काही आपण शिफारस केलेले तहसीलदार यावेत म्हणून दबाव तंत्राचा अवलंब करीत आहेत. अशा परिस्थितीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे श्रीगोंद्याच्या तहसीलदारपदाचा तिढा किती दिवसात सोडवितात? हे महत्वाचे ठरणार आहे.