श्रीरामपूर : विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा १९९९४ मतांनी पराभव केला. मतमोजणीच्या प्रारंभी विद्यमान आमदार व शिवसेनेकडून उमेदवारी मिळविलेले भाऊसाहेब कांबळे चार फे-यांनंतर पिछाडीवर पडले आहेत़. काँगे्रसचे उमेदवार लहू कानडे यांनी मतांची आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटपर्यंत टिकली. श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळे हे मागील निवडणुकीत काँगे्रसमधून निवडून आले होते़. त्यांना काँगे्रसने लोकसभेची उमेदवारीही दिली होती़. मात्र, त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला़. त्यानंतर त्यांनी काँगे्रसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झाले़ शिवसेनेने त्यांना उमेदवारी जाहीर केली़. त्यानंतर शिवसेनेतील लहू कानडे हे काँगे्रसमध्ये गेले़. त्यांना काँगे्रसने उमेदवारी दिली़. कांबळे यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फायदा उठवत कानडे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती़. त्यांना ऐनवेळी ससाणे गटानेही साथ दिली़. कांबळे यांच्या बाजुने गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रचार केला होता़. विखे यांच्या टिकेवर ससाणे व कानडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते़. दरम्यान कानडे यांना मतदारांनी कौल दिला आहे.
श्रीरामपूर विधानसभा निवडणूक निकाल : काँग्रेसचे लहू कानडे विजयी; शिवसेनेचे कांबळे पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 15:42 IST