श्रीरामपूर : श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार पटकावला आहे. १५ लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. रुग्णालयाचे वैैद्यकीय अधीक्षक डॉ.वसंत जमधडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पथदर्शी प्रकल्प तयार करण्यात आला होता. त्या अंतर्गत ग्रामीण व प्राथमिक रुग्णालयात दर्जेदार वैैद्यकीय सुविधा देणाऱ्यांना गौरवान्वित करण्याचा निर्णय झाला. कायाकल्प पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.येथील रुग्णालयाने मागील वर्षी हा पुरस्कार पटकावला होता. पुरस्कारासाठी स्वमूल्यांकन, विभागीय व राज्यस्तरीय मूल्यांकन केले जाते. फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यस्तरीय पथकाने येथे येवून प्रत्यक्ष पाहणी केली. जंतुसंसर्ग, जैैविक व घनकचरा व्यवस्थापन, तसेच जनतेचा सहभाग या बाबी तपासण्यात आल्या. रुग्णालयाला शंभरपैकी ९९.८८ गुण प्राप्त झाले.अंतर्गत व बाह्यरुग्ण विभाग, वातानुकूलित शस्त्रक्रिया विभाग, सुसज्ज प्रयोगशाळा या बाबीदेखील निर्णायक ठरल्या. दरम्यान, येथील ग्रामीण रुग्णालय हे तालुकावासीयांकरिता अभिमानाचा विषय ठरले आहे. सरकारी नाममात्र शुल्कामध्ये दर्जेदार वैैद्यकीय सेवा तसेच मित्रत्वाची नाती जपणारे वैैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णांची मने जिंकली आहेत. त्यामुळे रुग्णालयाकडे अनेकांचा ओढा वाढला आहे.हे यश माझे एकट्याचे नसून ते सांघिक आहे. सर्वच वैैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सामान्य जनता व लोकप्रतिनिधींचा त्यात सहभाग आहे. त्यांच्या प्रयत्नानेच दुसºयांदा पुरस्कार मिळू शकला. -डॉ.वसंत जमधडे, वैैद्यकीय अधीक्षक, श्रीरामपूर.
श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय ठरले अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 11:20 AM