पुणतांबा(जि. अहमदनगर ): भारतीय रिजर्व बँकेने आज पासून दोन हजाराच्या चलनी नोटा जमा करण्यास किंवा बदलून घेण्यास सुरवात केली असली तरी गेल्या कित्येक दिवसापासून ग्रामीण भागात दोनहजाराच्या चलनी नोटा तुरळक जणांकडे असल्याने अजून तरी सामान्य नागरिक नोटा जमा किंवा बदलण्यास बँकेकडे आले नाहीत. आता येथून पुढे शेतकरी वर्गाला आपल्या दिलेल्या भुसार मालाच्या बदल्यात व्यापाऱ्याकडून दोन हजाराच्या चलनी नोटा दिल्या जातील अशी अटकळ सामान्य शेतकरी व्यक्त करतोय.
ग्रामीण भागात असलेल्या बँकेच्या आवारात रिजर्व बँकेने केलेल्या सूचनांचे उलंघन होताना दिसत असून बँकेच्या ग्राहकांना सावलीसाठी मंडप, तात्पुरती सोय केलेली नाही. ही बाब प्रथमदर्शनी दिसून आली.