श्रीरामपूर : येथील सिध्दीविनायक पतसंस्थेने गत आर्थिक वर्षात ५३ कोटी ७४ लाख रुपयांचा व्यवसाय केला. त्यात त्यांना ३६ लाख ७४ हजार रुपयांचा नफा मिळाल्याची माहिती अध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काळे व उपाध्यक्ष बाळासाहेब कोकरे यांनी ही माहिती दिली. संस्थेच्या ठेवी पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्या असून निधीत २४ टक्के, तर भागभांडवलात १९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. ३२ कोटी ३६ लाख रुपयांच्या ठेवी संस्थेकडे असून २१ कोटी ३७ लाख कर्जे वितरीत करण्यात आली आहेत. गुंतवणूक ११ कोटी रुपयांवर गेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मागील आर्थिक वर्षात संस्थेला ऑडिटमध्ये ‘अ’ वर्ग मिळाला. या वर्षीही लेखापरीक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने संस्थेच्या भागभांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली, अशी माहिती संस्थेच्या लोन समितीच्या अध्यक्षा वर्षा जोशी यांनी यावेळी दिली. मोबाईल बँकिंग व क्युआर कोडद्वारे व्यवहारासाठी सोयी प्रदान केल्या जातील, अशी माहिती संचालक अमोल जोशी यांनी दिली. (वा.प्र.)
सिध्दीविनायक पतसंस्थेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:19 AM