अहमदनगर : मेहेर टेकडीवर मेहेरबाबांच्या जयघोषाने प्रफुल्लीत झालेले वातावरण...भजन अन भक्तीगितांत तल्लीन झालेले भाविक...११ वाजून ४५ मिनिटांनी बिगिन दि बिगिन... ही धून वाजली, त्यानंतर मेहेरधून म्हणण्यात आली. घड्याळात बाराचा ठोका पडताच मेहेर टेकडीवरील साठ हजार मेहेरप्रेमींनी मौनव्रत धारण केले. जल्लोषपूर्ण वातावरणाचे १५ मिनिटे शांततेत रुपांतर झाले. १२ वाजून १५ मिनिटांनी ‘मेहेरबाबा की जय’ चा जयघोष करत भाविकांनी मौन सोडले.अवतार मेहेरबाबांचे समाधीस्थळ असलेल्या अरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे बुधवारी अवतार मेहेरबाबांच्या ४९ व्या अमरतिथी सोहळ्यानिमित्त मौनव्रत सोहळा पार पडला. यावेळी देश-विदेशातील साठ हजार भाविक उपस्थित होते. ३१ जानेवारीला बाबांनी देहत्याग केला होता. तेव्हापासून अमरतिथी सोहळ्यानिमित्ताने या दिवशी भाविक १५ मिनिटांचे मौन पाळले जाते. या सोहळ्यासाठी देश- विदेशातून भाविक आवर्जून येतात. बुुधवारी सकाळी बाबांनी सुरु केलेल्या धुनिजवळ हजारो भाविक उपस्थित होते़. सकाळी ६ वाजता भजनास सुरवात झाली. त्यानंतर नंतर मेहेरधून म्हटली गेली व सुर्योदयास धुनी पेटवण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आपल्यातील दुगुर्णाचे प्रतिक म्हणून धुनीत लाकडाची काडी टाकली व दर्शन घेतले. समाधी दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. अमरतिथी सोहळ्यानिमित्त मेहेराबाद भारतासह २२ देशातील भाविक आले आहेत. भजने, गजल, नृत्ये, कव्वाली, नाटिका आदी सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम उपस्थितांसाठी पर्वणी ठरत आहेत. पोलीस बंदोबस्तासह अग्नीशमन दल व भाविकांसाठी मंडप, पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. गुरूवारी या सोहळ्याची सांगता होणार आहे.
मेहेरबाबांच्या अमरतिथी निमित्ताने साठ हजार मेहेरप्रेमींनी पाळले मौन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:36 PM
मेहेर टेकडीवर मेहेरबाबांच्या जयघोषाने प्रफुल्लीत झालेले वातावरण...भजन अन भक्तीगितांत तल्लीन झालेले भाविक...११ वाजून ४५ मिनिटांनी बिगिन दि बिगिन... ही धून वाजली, त्यानंतर मेहेरधून म्हणण्यात आली.
ठळक मुद्देदेश-विदेशातील भाविकांची उपस्थिती