अहमदनगर : ‘पिंगा ग पोरी पिंगा’ अशी हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय गाणी तर कधी देवाक काळजी रे, विठ्ठल नामाचा रे टाहो’ अशा भक्तीगीतांसह देश रंगिला रे, संदेसे आते है, अशा देशभक्तीपर गाण्यांवर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी बहारदार कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली़ त्याचवेळी अनोख्या सिंबा डान्सने कार्यक्रमात रंगत आणली़आदर्श कर्मचारी पुरस्कार सोहळ्यानिमित्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकारी, कर्मचाºयांनी आपल्यातील कलागुणांची मुक्त उधळण केली़ एरव्ही फायलींच्या धबाडग्यात हरवलेल्या जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाºयांमध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांच्या आविष्काराने उपस्थितांना थक्क केले़ कविता, नाटिका, प्रबोधनात्मक संदेश देणारे कार्यक्रम, स्वच्छता अभियान यावर उद्बोधक कार्यक्रम कर्मचाºयांनी सादर केले. ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या गाण्यावरील महिला कर्मचाºयांचा नृत्याविष्कार, सिंबा डान्स सादर करणाºया कर्मचाºयांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले़‘मेंदीच्या पानावर, खुदा भी आसमाँ से जब जमींपर देखता होगा’, अशा गाण्यांनी उत्तरोत्तर कार्यक्रमात आणखी रंगत आणली. गझल गायन, तबला वादनाचा कलाविष्कारही अनेकांनी सादर केला.गोड गळ्याचे अधिकारीजिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी प्रीतीचे झुळझुळ पाणी.., सुखके के सब साथी दु:ख मे न कोई..’ अशी गाणी आपल्या सुरेल आवाजात सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले. अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळताना, कामाच्या ताणतणावांना तोंड देतानाच सोळंके यांनी आपल्यातील गायक व गाण्याची आवड जपली आहे. त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.ग्रामसेवकाच्या लावणीची भुरळअकोले तालुक्यातील ग्रामसेवक रवींद्र ताजणे यांनी उत्कृष्ट लावणी सादर केली़ त्यांच्या लावणीने सभागृहालाही भुरळ पाडली़ त्यांनी सादर केलेल्या लावणीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली़ शेवगावचे राहुल पालवे, नगरचे अजय पवार व सचिन बागल, अकोलेचे प्रशांत अभंग, संगमनेरचे केशव घुगे, पाथर्डीचे संजय साठे, टाकळी काझी येथील तेजस्विनी शिंदे अशा अनेक कर्मचाºयांनी नेत्रदीपक कला सादर केल्या़
जिल्हा परिषदेत सिंबा डान्सची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 5:18 PM