रुईछत्तीशी : नगर परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. गेल्या दहा वर्षात सीनाला कधी इतके पाणी आलेच नाही, असे शेतकरी सांगत आहेत. सीना नदीचे पाणी पाहून शेतकरी राजा चांगलाच सुखावला आहे.
जिल्ह्यात आर्द्राचा सध्या सलग पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकामचे नद्या, नाल्या दुथडी भरून वाहत आहेत. सीना नदीलाही जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाने सीना नदीला जोरदार पूर आला आहे. दहा-बारा वर्षात एवढा पाऊस झाला नाही, असे सांगतिले जात आहे.