शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

विखे म्हणाले, मी तुमचाच सहकारी; ऊस दराचा प्रश्न सरकारच सोडवू शकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 5:20 PM

शेतक-यांच्या लढ्यामध्ये मी तुमच्याबरोबर आहे़ ३१५० रुपये दराने साखरेचे टेंडर काढलंय. त्यात सरकारने साखर आयात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे. ऊस दराचा प्रश्न सरकारच सोडवू शकेल.

लोणी : शेतक-यांच्या लढ्यामध्ये मी तुमच्याबरोबर आहे़ ३१५० रुपये दराने साखरेचे टेंडर काढलंय. त्यात सरकारने साखर आयात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे. ऊस दराचा प्रश्न सरकारच सोडवू शकेल. त्यामुळे येत्या १२ डिसेंबरला आम्ही याच प्रश्नावर मोर्चा काढणार आहोत, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले.लोणी येथे ऊस उराच्या प्रश्नावरुन शेतकरी संघर्ष समितीने गुरुवारपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला विखे यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी विखे यांनी आंदोलकांच्या मागण्या समजावून घेतल्या. तसेच एफआरपी आणि त्यावर २०० रुपये ऊस दर देण्याची तयारी आम्ही दर्शविली होती. आता सरकारनेच या प्रश्नात लक्ष घालण्याची गरज आहे. खासगी साखर कारखानदारीचे विवरणपत्र दाखल होत नाही, सार्वजनिक होत नाही़ मात्र, सहकारी कारखानदारीवरच सर्वजण तुटून पडतात.दरवर्षी ऊस दराचा प्रश्न चिघळतो. गाळप व्यवस्थित झाले, साखर उतारा चांगला मिळाला तर शेतक-यांनाही चांगला भाव देता येईल. आज शेतक-यांना २४०० रुपये दर देताना प्रवरा कारखान्याला ७० कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलावले आहे़ ऊस दराचा प्रश्न चर्चेने सुटू शकतो. त्यामुळे संघटनांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, असे विखे म्हणाले. यावेळी डॉ. अजित नवले, बाळासाहेब पटारे, अजय महाराज बारस्कर, डॉ. संदीप कडलग, कॉ. बन्सी सातपुते, संतोष वाडेकर, रुपेंद्र काळे, निलेश तळेकर, सुभाष येवले, बच्चू मोढवे, अशोक पठारे, जनार्दन घोगरे, राजेंद्र बावके, चांगदेव विखे, जालिंदर चोभे, विलास कदम, युवराज जगताप, अनिल औताडे, साईनाथ घोरपडे, शिवराज शेटे, गोरक्ष साळुंके, दिगंभर भोसले, प्रकाश मालुंजकर यांच्यासह शेतकरी आंदोलक उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSugar factoryसाखर कारखाने