खर्डा : येथील आशा गटप्रवर्तक व आशा सेविका यांनी विविध मागण्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केले; मात्र त्याचा तुटपुंजा मोबदला मिळाला. याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र हांगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आशा गटप्रवर्तक मंगल शिंगाने, शीतल मोरे, मनिषा भोसले, आशा सेविका सुषमा इंगळे, आशा टेकाळे, सविता अंकुश, गोदावरी नाईक, रेखा खटावकर, शालन आरुने, आशा जाधव व सविता खरात आदी उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळामध्ये आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन कुटुंबाची पर्वा न करता राष्ट्रीय कर्तव्य समजून जोमाने काम केले; मात्र त्या बदल्यात त्यांना तुटपुंजा वेतन व तुटपुंजे भत्ते मिळाले. मोठ्या हिरीरीने काम करणाऱ्या गटप्रवर्तक व आशा सेविका यांना वेठबिगारी व सशक्त विनामूल्य मजुरी काम करून कामाचा मोबदला मिळत नसल्याने अखेर गटप्रवर्तक व आशा सेविका यांनी संपाचा पवित्रा घेतला, असे आशा सेविकांनी सांगितले.
.........
१५ खर्डा आंदोलन