याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जीपमधून (एमएच १६ एजी ६८९२)प्रवास करणारे नाशिक - पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने जात असताना संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने पुढे असलेल्या टेम्पोला (एमएच १२ एनएक्स १२५८) या जीपची पाठीमागून धडक बसली. या अपघातात जीपचालक अभिजीत चंद्रसेन आहेर यांच्यासह मयुर विजय बागूल, तेजस कैलास आहेर, एकनाथ भाऊसाहेब आहेर, प्रीतम बाळासाहेब आहेर, भाऊसाहेब रामनाथ आहेर (सर्व रा. लोणी, ता. राहाता) हे जखमी झाले. या अपघातात जीपचे मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे अपघातस्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना महामार्ग पोलिसांनी व स्थानिक तरुणांनी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी संगमनेरातील रुग्णालयात दाखल केले. डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी नारायण ढोकरे, अरविंद गिरी, सुनील साळवे, पंढरीनाथ पुजारी, भरत गांजवे यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला हटविली.
---------
फोटो ओळ : २३घारगाव अपघात
फोटो नेम : नाशिक-पुणे महामार्गावर जीप-टेम्पो अपघातातील नुकसानग्रस्त जीप.