श्रीगोंदा : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी चालू आहे. मात्र संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी निमगाव खलू व पारगाव फाट्यावर गुरुवारी (१६ एप्रिल) नाकेबंदी करून १२ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सहा परप्रांतीय नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक पीकअप जीप व तीन मोटारसायकली जप्त केली आहे. पुण्यावरून कुळधरणकडे जाणाºया एका शेतीमालाची वाहतूक करणाºया गाडीत अशोक बाळासाहेब शिंदे, सोमनाथ अशोक देशमुख, शुभांगी सोमनाथ देशमुख (रा.कोपर्डी, ता.कर्जत), पोपट बंकट सुपेकर, उत्तम दत्तात्रय कळसकर, दीपक बंकट सुपेकर (रा.कुळधरण, ता.कर्जत) हे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बसून आले होते. पोलिसांनी निमगाव खलुमध्ये एम.एच.-१६, सीसी ५७४८ नंबरचा पिकअप अडविला. त्या ह्या व्यक्ती आढळून आल्या. या बाबतची फिर्याद पोलीस कॉस्टेबल अमोल आजबे यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तीन मोटारसायकलवरून राजस्थानकडे चाललेल्या लंगमराम कुमावत, जठाराम कुमावत, मुनराम कुमावत, अंबाराम कुमावत, कमलराम कुमावत, हेमाराम कुमावत (रा. जि.बाडनेर, राजस्थान) यांना नगर-दौड रोडवरील पारगाव फाट्यावर तीन मोटारसायकलीसह ताब्यात घेतले. याबाबतची फिर्याद पोलीस कॉस्टेबल संजय काळे यांनी दिली.
संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा परप्रांतीयांसह १२ जणांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 2:53 PM