घारगाव : गारेवाडी (ता़ संगमनेर) परिसरात बिबट्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. गुरूवारी पहाटे बिबट्याने हल्ला करीत वासरू ठार केले. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.अकलापूर गावांतर्गत असणाºया गारेवाडीतील महादू गणपत गारे या शेतकºयाने नेहमीप्रमाणे आपले वासरू घरासमोर बांधले होते. गुरूवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून हे वासरू ठार केले. गारे हे सकाळी झोपेतून उठले असता त्यांना वासरू बिबट्याने मारलेल्या अवस्थेत दिसले. घटनेची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 4:25 PM