मोदी, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी
By शेखर पानसरे | Published: March 4, 2023 10:12 AM2023-03-04T10:12:03+5:302023-03-04T10:40:20+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.
शेखर पानसरे
संगमनेर : मोदी, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संगमनेरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महावितरण कंपनीकडून वीजबिल वसुलीच्या नावाखाली कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो आहे. कांद्याला भाव मिळत नाही. महागाई वाढली आहे. त्यामुळे शनिवारी (दि. ०४) काँग्रेसच्यावतीने संगमनेर बसस्थानकाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा असून त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. मात्र, सरकार उद्योजकांना पाठीशी घालत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. अशी टीका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून केली. कोणत्याही परिस्थितीत कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करू नये. कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव मिळावा. इतरही शेतमालाला हमीभाव जाहीर करावे. आदी मागण्या करण्यात आल्या.