लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : (जि.अहमदनगर) शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी धिम्या गतीने मतदान सुरू आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत साडे सहा टक्के मतदान झाले होते. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक दहा टक्के मतदान नोंदवले गेले. महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे व वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी मतदानाचा हक्क बजावला.
शिर्डीमध्ये तिरंगी लढत होत आहे. महाआघाडीचे वाकचौरे व महायुतीचे लोखंडे यांनी शिर्डी शहरातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. वंचितच्या रुपवते यांनी त्यांच्या अकोले शहरातील केंद्रावर हक्क बजावला.
सकाळी नऊ वाजेपर्यंत शिर्डी अकोला येथे ६.५, संगमनेर येथे १०.८७, शिर्डी ५.८५,कोपरगाव ५.११, श्रीरामपूर ५.१७ तर नेवासे येथे ५.०४ टक्के मतदान नोंदवले गेले.