महेंद्र मच्छिंद्र केदार (३५), सागर भीमाजी डोके (२५, दोघेही रा. साकूर, ता. संगमनेर), अशोक दादा वारे (२९, रा. तहाराबाद, ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. पुणे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार, सहायक वनरक्षक मयूर बोठे यांना मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील दुर्मीळ खवल्या मांजराची विक्री होणार असून ते चारचाकी वाहनातून येणार असल्याचे समजले. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. तस्करी करणाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पुणे येथे या मांजराची विक्री करण्याचे सोडून ते संगमनेर तालुक्यात पठार भागात आले. वनाधिकारी त्यांच्या मागावर राहिले. खंदरमाळवाडी परिसरात सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके, पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी पाठलाग करून डाळिंबाच्या बागेत लपून बसलेल्या तिघांना पकडले. त्यांना पुण्याला नेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
खवले मांजर, वाघनखांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:22 AM