ब्राह्मणी : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीतील घेरूमाळवस्तीवर हापसे बंधूंच्या विहिरीतील पाणबुडी विद्युत मोटारीमध्ये भला मोठा साप घुसल्याचे रविवारी आढळून आले. आप्पासाहेब हापसे, गोपीनाथ हापसे व बापूसाहेब हापसे या तिघा भावांच्या मालकीची विहीर आहे. दुष्काळी परिस्थितीत नियमित वापरा योग्य पुरेसे पाणी आहे. अशोक हापसे यांनी जनावरांना पाणी पाजण्यासाठी मोटार चालू केली असता पाणी येईना. मोटार नादुरूस्त झाल्याचा अंदाज ओळखून सतिष हापसे, अशोक हापसे व महेंद्र हापसे यांनी मोटार वर काढली. मोटारीची वायर व पाईप तपासून पाहत असताना मोटारीमध्ये भला मोठा साप असल्याचे दिसताच उपस्थितांची भंबेरीच उडाली. अखेर मोठी हिम्मत करून मोटार खोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेपटीच्या बाजूने आत ओढला गेलेल्या सापाचे तोंड मोटारीत गुतल्याने गुदमरून आधीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. अर्धा भाग मोटारीत तर अर्धा भाग पाईपमध्ये होता.
ब्राम्हणीत विहिरीतील मोटारीमध्ये निघाला साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 5:12 PM