कोतूळ : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने कोतूळसह संपूर्ण आदिवासी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी सकाळी कोतूळ परिसरात उसाचे पाचरट, जनावरांचे भूस, दुचाकी गाड्यांचे सीटवर पडलेल्या दवबिंदूच्या ठिकाणी हिमकण तयार झाले होते. परिसरात पारा चार ते पाच अंशाच्या दरम्यान होता.कोतूळसह तालुक्यातील मुळा परिसर तसेच ब्राम्हणवाडा व सातेवाडी परिसरात गेल्या दहा, वीस वर्षाचे थंडीचे रेकॉर्ड मोडीत काढले गेले. गेल्या तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने परिसर गारठून गेला आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांवर थंडीचा परिणाम झाल्याने दूध उत्पादन निम्म्यावर आले. तर शेतात रात्री पाणी भरण्यासाठी शेतकरी जात नाहीत. शनिवारी सकाळी बोरी, वाघापूर, कोतूळसह परिसरात दुचाकी गाड्यांच्या सीटवर, उसाचे पाचरटावर दवबिंदू साठण्याच्या जागेवर बर्फाचे कण तयार झाले होते.
कोतूळ परिसरात हिमकण : पारा ५ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 5:41 PM