एमआयआरसीमध्ये गुरुवारी झालेल्या दीक्षांत सोहळ्यात जवानांनी देशसेवेची शपथ घेतली. एमआयआरसीमधील अखोरा ड्रिल मैदानात शानदार संचलन करीत जवानांनी उपस्थितांची मने जिंकली. लष्कराच्या पाइप बँडपथकाने सादर केलेल्या धूनवर जवानांचे मैदानात आगमन झाले. एमआयआरसीचे निशाण (ध्वज) व तिरंग्याला जवानांनी मानवंदना दिली. नगरमधील एसीसी अँड एसचे कमांडंट मेजर जनरल शैलजानंद झा यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर आपापल्या धर्मगुरूंनी जवानांना देशरक्षणाची व निष्ठेची शपथ दिली.
-------
प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन जवानांचा पदके देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये जनरल के. सुंदरजी गोल्ड मेडल मुकेश सिंग याला प्रदान करण्यात आले. त्यानंतर जनरल के.एल. डिसुझा सिल्व्हर मेडल जाॅय बोरा याला, तर जनरल पंकज जोशी ब्राँझ मेडल शिव शंकर यांना प्रदान करण्यात आले.
-------
फोटो - १८एमआयआरसी
खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून एमआयआरसीतील जवानांनी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला.