अकोले : मतदारसंघासह पठारभागातील पाटपाण्याचे आणि रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही भाजपाचे उमेदवार वैभव पिचड यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील पठारभागाच्या दौ-यावर महायुतीचे उमेदवार वैभव पिचड हे बुधवारी आले होते. त्यावेळी बोटा गावातील सभेमध्ये ते बोलत होते. जनार्दन आहेर, सुरेखा गव्हाणे, अशोक इथापे, मीनानाथ पांडे, अरूण इथापे, बबन गागरे, उत्तम ढेरंगे, संतोष शेळके, दिलीप साळगट, विलास शेळके, नितीन आहेर उपस्थित होते.पिचड म्हणाले, पाच वर्षे विरोधात असताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम केले. वेळप्रसंगी रास्ता रोको आंदोलनही केले. मात्र आपले सरकार नसल्याने मतदार संघातील रस्त्यांची कामे, पाटपाण्याचे प्रश्न सोडवता आले नाही. तरीही आपण आपल्या आमदार निधीतून थोडा-थोडा निधी देण्याचे काम केले आहे. सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रखडलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम आपल्याला करायचे आहे. पिचडांनी पस्तीस वर्ष काय केले ? असे प्रतिस्पर्धी उमेद्वार सांगतात. माजी मंत्री पिचड यांनी पठारभागाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. याभागातील सर्व सामान्य शेतकरी सुजलाम सफलाम झाला आहे. पाच वर्षात महायुतीच्या सरकारवर कुठलाच भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही.शिवाजी तळेकर म्हणाले, अकलापूर गावच्या विकासासाठी पिचड यांनी भरभरून निधी दिला. त्यामुळे आज त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागली आहेत. अशोक वाघ म्हणाले, पिचड यांनी पठारभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे. यावेळी उत्तम ढेरंगे, अशोक इथापे, दिलीप साळगट, बाळासाहेब ढोले, अरूण इथापे, गणेश यांची भाषणे झाली.
अकोलेतील सर्व प्रश्न सोडविणार-वैभव पिचड; पठार भागात दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 1:51 PM