अहमदनगर : नगर शहराच्या काही भागात कोरोना रुग्ण सापडल्याने हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून तसेच लगतचा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवारी जारी केले आहेत. घोषित केलेल्या कंटेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा व बफर झोन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री सेवा २२ मे रोजी दुपारी ४ वाजेपासून ४ जून, २०२० रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे आगमन प्रतिबंधीत करण्यात असल्याचे आदेशात म्हटले आहे. जुने मनपा कार्यालय चौक, डॉ.होशिंग हॉस्पीटल चौक, शनी चौक, तख्ती दरवाजा मस्जीद, आशा टॉकीज, पंचपीर चावडी चौक, अंबिका महिला बँक ते जूुनी मनपा चौक हा भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून तर यतीम खाना बिल्डींग, न्यामत खानी मोहल्ला, निंबाळकर गल्ली, तवकल वस्ताद तालीम, श्रीपाद ग्रंथ भांडार, घुमरे गल्ली, आदर्श शाळा, माणिक चौक, कोतवाली पोलीस स्टेशन, बाळासाहेब देशपांडे दवाखाना, नांगरे गल्ली, जुना बाजार रोड, पटवेकर गल्ली, फुलसौंदर चौक, शिवम थिएटर, मनपा फायर स्टेशन, भाऊसाहेब फिरोदीया स्कूल हा भाग बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. शनी चौकातील डि.पी.जवळील रस्ता हा प्रवेशासाठीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.