स्टार ११९९
श्रीरामपूर : लूटमार करण्यासाठी गुन्हेगार दिवसेंदिवस नवनवीन क्लृप्त्या वापरण्यात येत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. याला अनेक ज्येष्ठ बळी ठरत आहेत.
गुन्हेगार रेकी करून एक कम्पू तयार करत बँकेच्या परिसरात किंवा गर्दीच्या ठिकाणी विनाकारण वादाचे प्रसंग निर्माण करतात. एखाद्या व्यक्तीला धडक देऊन किंवा किरकोळ वाद घालून आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतात. नेमके त्याचवेळी गर्दीतील रेकी केलेल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची लूट करतात. असे अनेक प्रकाश मोठ्या शहरांमध्ये उघडकीस आले आहेत. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.
---------
काय काळजी घ्याल?
बँकेतून पैसे नेताना ते व्यवस्थित सांभाळून न्यावेत. कोणतीही व्यक्ती आपणाला खाण्यासाठी काही पदार्थ देत असेल तर तो टाळावा. कोणत्याही व्यक्तीची आपण मदत मागितली नसताना तो स्वत:हून मदत करण्यास येत असेल तर सतर्कता बाळगावी. मोठी रक्कम नेत असताना कुठेही थांबून गप्पा मारत बसू नये.
----------
अनेकांची होतेय लूट
अनेक ज्येष्ठांशी शुल्लक कारणावरून वाद घालून त्यांची लूट करण्याचे प्रकार घडत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.
----------
असे तुमच्या बाबतीतही घडू शकते
एखादा व्यक्ती बँकेतून जात असताना एका युवकाने त्याला धक्का दिला. या छोट्याशा कारणातून वाद सुरू झाला. या दरम्यान तेथे इतर काही तरुण आले. त्यातील एकाने संधी साधून ज्येष्ठांच्या हातातील पैशांची बँग घेऊन पळ काढला, असे घडू शकते.
-------
बँकेत पैसे मोजून देण्याचे सहकार्य करण्याची भावना ज्येष्ठ व्यक्तीला बोलून दाखविली जाते. ज्येष्ठाने होकार देताच पैसे मोजून दिले जाते. रक्कम बरोबर आहे असे सांगितले जाते. मात्र घरी जाऊन प्रत्यक्ष मोजणी केल्यावर ते कमी भरल्याचे आढळून येते.
-------