यावेळी पत्नी सोनाली सूद, मुलगा इशांत सूद, नीती गोयल, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, पोलीस निरीक्षक दौलत जाधव उपस्थित होते. कोपरगाव नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनोद राक्षे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम पार पडला आहे.
कोरोनामुळे कोपरगाव शहरातील अनेक विद्यार्थी पालकांच्या आर्थिक परिस्थितीअभावी मोबाइल नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित होते. यातून त्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत होते. त्यासाठी विनोद राक्षे यांनी अशा विद्यार्थ्यांचा स्वतः घरोघरी जाऊन सर्व्हे केला. यामध्ये सुमारे १०० विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्याकडे केवळ मोबाईल नाहीत. त्यावर राक्षे यांनी ही समस्या थेट त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असलॆल्या अभिनेते सोनू सूद यांच्या निदर्शनास आणून दिली. सूद यांनी तत्काळ या १०० मुलांना मोबाइल देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. त्यावर सूद यांनी शुक्रवारी थेट कोपरगाव गाठत १०० मुलांना स्वतः मोबाइल भेट दिली.
............
विद्यार्थी आपल्या देशाचे भविष्य आहे. ज्यांना गरज आहे त्यांना प्रत्यक्षात मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षणासाठी कोपरगावातील गरीब विद्यार्थ्यांना अजूनही काही मदत लागल्यास निश्चितच केली जाईल.
- सोनू सूद
...........
कोपरगाव शहरातील गरीब विद्यार्थ्यांना मोबाइल देण्यासाठी माझे मित्र सोनू सूद यांना संपर्क साधला असता, त्यांनी तत्काळ मोबाइल देण्याचे मान्य केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मोबाइल देण्यात आले. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपला प्रयत्न सार्थकी ठरल्याचे समाधान वाटत आहे.
- विनोद राक्षे, माजी सभापती, शिक्षण मंडळ, कोपरगाव.
..........
फोटो०९- सोनू सूद, कोपरगाव