इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या अद्ययावत शोरूममधून ‘बीएस-६’ वाहनांच्या विक्रीला गत वर्षापासून सुरुवात झाली आहे. कोरोना संकटाच्या काळात टाटा मोटर्सने विविध बँका, फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून विशेष सवलतीच्या योजना जाहीर केल्या असून, याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लीना शोरूमचे संचालक शेखर साबळे यांनी केले आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी टाटा मोटर्स कंपनीने बाजारात ‘बीएस-६’ मानांकन असलेली वाहने विक्रीसाठी आणली आहेत. या वाहनांना देशभरात मोठी मागणी आहे. टाटा मोटर्सच्या सर्वच वाहनांचा ग्राहकांकडून मागणी वाढते आहे. अनेक जण मालवाहतूक व्यवसायाकडे वळले आहेत. याचा विचार करत ग्राहकहिताच्या योजना संगमनेरातील लीना ऑटोमोटिव्ह शोरूमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना मालवाहतूक चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी शोरूमध्ये येण्याची गरज नसून, ऑनलाइन प्रणालीद्वारे घरबसल्या वाहनाची बुकिंग करता येईल. कोरोनाच्या परिस्थितीत वाहने खरेदी करण्यासाठी बॅँका व फायन्सास कंपन्या कमी व्याजदारात तात्काळ वित्तपुरवठा करत आहेत. वाहन खरेदी केल्यानंतर पहिला हप्ता हा दोन महिन्यांनंतर सुरू होईल. अत्यंत कमी कागदपत्रांत व तात्काळ टाटा मोटर्सची विविध वाहने खरेदीसाठी वित्तपुरवठा केला जातो आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे योजना सुरू केल्याने कोरोना प्रादुर्भावाचा धोका टळला आहे. टाटा मोटर्सची वाहने खरेदी केलेल्यांना व्यवसाय सुरू करण्यास मदत होते आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
-----------
कमी व्याजदरात ग्राहकांना फायदा
सध्या टाटा मोटर्सतर्फे टाटा एसीई म्हणजे छोटा हत्तीवर असलेली १.९९ टक्के आणि २.९९ टक्के व्याजदर योजना, शिवाय टाटा इंट्रा व्ही टेनवर असलेली ३.९९ टक्के व्याजदर योजना ग्राहकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. इतर कंपन्या १६ टक्के व्याजदाराने वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठा करत असताना टाटा मोटर्सच्या कमी व्याजदराचा ग्राहक लाभ घेत आहेत, असे शोरूमचे संचालक शैलेंद्र साबळे यांनी सांगितले.