शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

मराठी चित्रपटात काम करण्याचं श्रीदेवीचं स्वप्न राहिलं अधुरं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 1:20 PM

अभिनय आणि सौंदर्यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळं त्यांचे मराठी चित्रपटात काम करण्याचं स्वप्न स्वप्न अधुरं राहिलं.

अहमदनगर : अभिनय आणि सौंदर्यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळं त्यांचे मराठी चित्रपटात काम करण्याचं स्वप्न स्वप्न अधुरं राहिलं.

मराठीतील प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे यांनी २०१५ मध्ये अगं बाई अरेच्चा - २ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाची निमिर्ती अहमदनगरचे उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केली होती. हा चित्रपट २२ मे २०१५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बहुतांशी चित्रिकरण अहमदनगर जिल्ह्यात झाले होते. चित्रपटात प्रमुख भुमिका सोनाली कुलकर्णीने निभावली होती.

(बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका होती श्रीदेवी; जाणून घ्या 10 गोष्टी)

भरत जाधव, प्रसाद ओक, माधव देवचक्के, सिध्दार्थ जाधव, सुरभी हांडे यांच्या भुमिका चित्रपटात होत्या. या चित्रपटाचे म्युझिक २० वर्षीय निशादने केले होते. या म्युझिकचे लाँचिग श्रीदेवी यांच्या हस्ते झाले होते. यावेळी त्यांनी चित्रपटासह संगीतकार निशादला शुभेच्छा दिल्या. तसेच मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छाही यावेळी व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील प्रेक्षकही श्रीदेवी यांना मराठी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक होते. श्रीदेवी यांच्या निधनामुळं मराठी चित्रपटात काम करण्याचे श्रीदेवी यांचे स्वप्न अधुरं राहिल्याची खंत चित्रपट निर्माते उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केले.

(दैव जाणिले कुणी...श्रीदेवी यांची 'ही' इच्छा राहिली अपूर्ण )

श्रीदेवी यांचा प्रवास - 

श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. वडील पेशाने वकील होते. श्रीदेवी यांना एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. ‘थुनीवावन’ हा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवी यांची झलक दिसली होती. पण त्या या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हत्या. पण, 1983 मध्ये 'हिम्मतवाला' हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या.  1996 मध्ये  निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये  पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  मॉम हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 

(श्रीदेवी यांची शेवटची झलक, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल)

श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट....जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम,मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता,जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी,चालबाज,खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह,लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश. 

 

यांनी व्यक्त केलं दुख - 

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड, राजकरण आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, रजनीकांत, कमल हसन, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉनी लिव्हर, प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटा, नेहा धुपिया, झरिन खान यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.   प्रियांका चोप्राने शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले की, माझ्याकडे शब्द नाहीत. सर्वांकडून श्रीदेवींना श्रद्धांजली. आजचा काळा दिवस. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSrideviश्रीदेवीcinemaसिनेमाSonali Kulkarniसोनाली कुलकर्णी