जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुश्रीफ यांची गोंदकर यांनी साईबाबा विमानतळावर भेट घेऊन चर्चा केली. संस्थानच्या कोविड रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेत आहेत. संस्थानचे कोविड सेंटर अपुरे पडू लागल्याने साई संस्थानने आपले सुपर स्पेशालिटी रुग्णालयही कोविडमध्ये रूपांतरित केले आहे. येथेही विनामूल्य उपचार करण्यात येतात. सध्या दोन्ही सेंटरमध्ये ६०० वर रूग्ण उपचार घेत आहेत. परंतु डॉक्टर्स, नर्स व आरोग्य कर्मचारी स्टाफची कमतरता असल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
शासनाकडून पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात यावा, तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शासनामार्फत डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, त्याचप्रमाणे औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी गोंदकर यांनी मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, गंगाधर वाघ उपस्थित होते.
निवेदनावर सुधाकर शिंदे, संदीप सोनवणे, महेंद्र शेळके, नीलेश कोते, अमित शेळके, राकेश कोते, चंद्रकांत गोंदकर, विशाल भडांगे, सुनील गोंदकर, प्रकाश गोंदकर, राहुल कुलकर्णी, गणेश गोंदकर, अभिराज कोते, लखन वाघचौरे, अमोल सुपेकर, साई कोतकर, शायद सय्यद, राहुल फुंदे, फरयाद शेख आदींची नावे आहेत.