अहमदनगर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात तीन हजार पोलिसांचा खडा पहारा आहे. जिल्ह्याची लोकसंख्या मात्र पन्नास लाखांपेक्षा जास्त आहे. विविध ठिकाणी नागरिकांना घरी बसविताना पोलिसांना नाकीनऊ येत आहे.जिल्ह्यात सध्या अधिकारी अणि कर्मचारी असे एकूण ३ हजार २५० पोलिसबळ नियुक्तीस आहे़. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमाबंदी आणि संचारबंदी करण्यात आली आहे तसेच रस्त्यावर वाहने आणण्यासही बंदी आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मात्र नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. पोलिसांसह होमगार्डही तैनात करण्यात आलेले आहेत.१४ ठिकाणी जिल्ह्याची सीमा बंदबाहेरील जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात कोणी येऊ नये यासाठी बीड, सोलापूर, नाशिक व औरंगाबाद या जिल्ह्यांना जोडणा-या १४ ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणी २४ तास पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाºया वाहनांना सोडण्यात येत आहे.पोलिसांची खेडोपाडी पेट्रोलिंगजिल्ह्यात अनेक ठिकाणी खेडोपाडी सकाळी व सायंकाळी मोठी गर्दी होत आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करून नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करीत आहे.बाहेरील कुमक नाहीकोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात पोलीस बळ देण्यात आलेले नाही. संपूर्ण देशभरात एकसारखीच परिस्थिती असल्याने स्थानिक ठिकाणी आहे. त्या पोलीस बळावरच अंमलबजावणी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले.
करोनासाठी खडा पहारा; नगर जिल्ह्यात तीन हजार पोलीस पोलिसबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 1:54 PM