पात्र नागरिक लसीपासून वंचित राहत असून राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरून ते होत आहे. त्यामुळे रोज लसीकरणाच्या आशेवर येणाऱ्या पात्र लोकांमुळे गर्दीचे प्रमाण वाढून कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत आहे. वेळेत लसीकरण न झाल्यास बाधा होऊन मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित दोषींची चौकशी करून तत्काळ कारवाई करावी तसेच राष्ट्राच्या आर्थिक विकासाला पाठबळ देणाऱ्या कार्यप्रवण वयोगटाला १८ ते ४५ तत्काळ लसीकरण सुरू करावे. केडगाव उपनगरातील भागात रुग्णांची झपाट्याने वाढ लक्षात घेता सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारावे. रुग्णालयांकडून सर्व स्तरातील नागरिकांची आर्थिक लूट होण्याच्या तक्रारी निदर्शनास आल्या आहेत तरी सद्यपरिस्थितीत जनतेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन सर्व रुग्णांवरील उपचार शासनाने मोफत करावे व खासगी रुग्णालय शासनाने ताब्यात घ्यावेत. रेमडेसिविर हे कोरोनावरील इंजेक्शन रुग्णांना उपचार घेत असलेल्या रुग्णालयात उपलब्ध करावे, असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी मानवहित लोकशाही पक्षाचे अध्यक्ष महादेव नेटके , रुद्र प्रतिष्ठान केडगावचे संस्थापक संजय गारुडकर, केडगाव जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष विशाल पाचारणे उपस्थित होते.