आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनात कोतकर यांनी म्हटले आहे, नगर शहरामध्ये गेल्या ८ दिवसांपासून कोरोना संसर्ग विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शासकीय रुग्णालय, मनपा रुग्णालयांबरोबरच खासगी हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. तसेच आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे उपचारासाठी रुग्ण व नातेवाइकांची धावपळ होत आहे. यासाठी महापालिकेने रुग्णांना चांगली आरोग्य देण्याचे कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासकीय इमारतीमध्ये ताबडतोब कोविड कक्ष सुरू करून रुग्णांना व नातेवाइकांना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक जाहीर करून सर्व आरोग्य सुविधांची माहिती देण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजीसभापती तथा नगरसेवक मनोज कोतकर यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
केडगावला कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:19 AM