लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : शासनाने छोट्या शहरातील नगरपरिषद, नगरपालिका यांचे उत्पन्नाचे श्रोत वाढविण्यासाठी तीन मजली इमारतीऐवजी १६ मजली इमारती बांधण्याची परवानगी जाहीर केली आहे. मात्र, परवानगी देऊनही प्रत्यक्षात नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात संगणकावर दिसत नाही. तरीही योजना त्वरित ऑफलाईन सुरू करावी, अशी मागणी कोपरगाव क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे नुकतीच एका निवेदनाद्वारे केली आहे.
१६ मजली इमारतींमुळे पालिकेचे २५ टक्के उत्पन्न वाढणार आहे. कमी जागेत अधिक बांधकाम होवून जास्तीत जास्त प्रशस्त घरे, शॉपिंग सेंटर होतील. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडून शहराची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. यातून बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल. बांधकाम व्यवसायाशी निगडित असलेले कारागीर, मजूर, इतर व्यावसायिक यांच्या उदरनिर्वाहाच्या समस्या मिटण्यास मदत होणार आहे. तेव्हा पालिका प्रशासनाने एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अर्थात यू. डी. सी. पी. आर. प्रणाली त्वरित सुरू करावी. जर ही नियमावली सुरू करण्यास विलंब झाला तर बांधकाम व्यावसायिक व त्यांच्यावर विसंबून असलेल्या इतर व्यावसायिकासह मजुरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असेही नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी अध्यक्ष प्रसाद नाईक, उपाध्यक्ष, विलास खोंड, सचिव चंद्रकांत कौले, खजिनदार हिरेन पापडेजा, दिनार कुदळे, राजेश ठोळे, यश लोहाडे, संदीप राहतेकर, सचिन बोरावके, आनंद आजमेरे, मनीष फुलफगर, प्रदीप मुंदडा, राहुल भारती, सिध्देश कपिले, आकुब शेख, जगदीश नीळकंठ, किसन आसने, अक्षय जोशी उपस्थित होते.
..................
फोटो२८- क्रेडाई निवेदन, कोपरगाव
..
ओळी: कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना कोपरगाव क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक आदी.
281220\img-20201224-wa0019.jpg
कोपरगाव क्रेडाई संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देण्यात आले.