श्रीरामपूर व कोपरगाव या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या राज्यमार्ग ४७ वर पुणतांबा गाव आहे. पुणतांबा हे राहाता तालुक्यात येत असले तरी तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून एसटी नसल्याने शिर्डी व राहाता येथे जाण्यासाठी कोपरगावावरून राहाता किंवा शिर्डीला जावे लागते. त्यामुळे भाविक, रुग्ण व शासकीय कामासाठी जाण्याकरिता वेळ जास्त लागतो. वाढलेल्या भाड्याचा भार सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. कोर्टाचे काम, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिर्डी ते राहाता येथे दररोज जावे लागते. श्रीरामपूर आगाराने दिवसातून दोन फेऱ्या सुरू कराव्यात, अशा आशयाचे निवेदन श्रीरामपर आगार प्रमुखांना शिवसेना विभाग प्रमुख आबासाहेब नळे, अनिलराव नळे, उपशहर प्रमुख अशोक गायकवाड, ॲड. राहुल नवले, दत्तात्रय धनवटे, अनिल महानूर यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
श्रीरामपूर - शिर्डी बस सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:27 AM