शेवगाव : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली.
तालुक्यातील अमरापूर येथे आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे या मागणीसाठी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन केले.
राजळे म्हणाल्या, स्व. लोकनेते गोपीनाथ मुंढे यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व केले. तीच भूमिका माजी मंत्री पंकजा मुंढे साकारत आहेत. हे शासन सर्वोच्च न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडण्यास अपयशी ठरले आहे. जातीपातीचे राजकारण न करता संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी शासनाची असते. परंतु, या शासनाने ठोस पाऊल उचलले नाही. राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली.
तहसीलदार अर्चना पागिरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिसांनी ३० आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले. भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, ताराचंद लोढे, माणिकराव खेडकर, गोकुळ दौंड, धनंजय बडे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, रणजित बेळगे, नीलेश फुंडे, वजीर पठाण, अजय भंडारी, मंगल कोकाटे, काशीबाई, गोल्हार, बापूसाहेब पाटेकर, आशा गरड, सुभाष केकाण, उद्धवराव वाघ, बापूसाहेब भोसले, अशोक चोरमले, विष्णूपंत अकोलकर, राजेंद्र डमाळे, सोमनाथ खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नगरसेवक बजरंग घोडके, नामदेव लबडे, बबन बुचकूल, अनिल बोरुडे, संजय किर्तने, वामन कीर्तने. अशोक गोरे, अशोक खरमाटे, कोंडीराम नरोटे, सुनील रासने, तुषार वैद्य, उमेश भालसिंग, राहुल कारखिले, जे. बी. वांढेकर, भीमराज सागडेे, सचिन वायकर, वाय. डी. कोल्हे, नगरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, रवी सुरवसे, रामकिसन काकडे, बाबासाहेब गिलबिले, श्रीकांत मिसाळ, सुभाष ताठे, शरद अकोलकर, केशव आंधळे आदी उपस्थित होते.
----
२६ शेवगाव बीजेपी
अमरापूर येथे चक्काजाम आंदोलनप्रसंगी आमदार मोनिका राजळे व इतर.